परभणीत 19 शाखातील कामकाज ठप्प ; संपाचा परिणाम

कैलास चव्हाण
बुधवार, 30 मे 2018

परभणीः बॅंक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपात परभणी जिल्ह्यातील 800 कर्मचारी सहभागी झाले असून बुधवारी (ता.30) शहरातील जुन्या स्टेट बॅंक हैद्रबाद बॅंकेच्या मुख्य शाखेत निदर्शने करण्यात आली.

वेतनवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संघटनांच्या 'युनाटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' या शिखर संघटनेने पुकारलेल्या संपात परभणी जिल्ह्यातील 800 अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले असून यामुळे दोन दिवसात दोन हजार कोटींच्या व्यवहारावर परिणाम होणार आहे.

बॅंकाच्या देशव्यापी संपामुळे  परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंकाच्या 19 शाखातील कामकाज बुधवार (ता.30) पासून ठप्प झाले आहे.युनाटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' या शिखर संघटनेने सकाळी 10 वाजता येथील जुनी स्टेट बॅंक हैद्राबादची  मुख्य शाखा असलेली आणि आताच्या इंडिया बॅंकेत निदर्शने करण्यात आली.संपाचा पिक  कर्जवाटपासह एटीएमवर देखील परिणाम झाला आहे.

Web Title: work stop 19 branch in parbhani; the result of strike