पोलिस ठाण्यासमोर जाळून घेऊन युवकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

अभिजित श्रीनिवास मस्के हा तरुण दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वडवणी पोलिस ठाण्याजवळ आला. बाजूच्या रस्त्यावर थांबून त्याने स्वत:जवळील बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेतले. आग लागल्यानंतर त्याने जोरात ओरडण्यास सुरवात केल्याने परिसरातून नागरिकांनी त्याला विझविण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत तो 70 टक्के भाजला होता

वडवणी - एका तरुणाने पोलिस ठाण्याच्या आवारात अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून घेतल्याची घटना रविवारी (ता. 14) दुपारी घडली. गंभीर भाजलेल्या अभिजित श्रीनिवास मस्के (वय 25, रा. बाहेगव्हाण, ता. वडवणी) या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अभिजित श्रीनिवास मस्के हा तरुण दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वडवणी पोलिस ठाण्याजवळ आला. बाजूच्या रस्त्यावर थांबून त्याने स्वत:जवळील बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेतले. आग लागल्यानंतर त्याने जोरात ओरडण्यास सुरवात केल्याने परिसरातून नागरिकांनी त्याला विझविण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत तो 70 टक्के भाजला होता. वडवणी पोलिसांनी त्याला तत्काळ पोलिस व्हॅनमधून बीड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दुपारी काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. याबाबत वडवणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

कालपासून गप्पच; कारण अस्पष्ट
दरम्यान, अभिजित मस्के याने आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट आहे. मात्र, कालपासून तो कोणालाच काही बोलत नव्हता. घरच्यांना व गावातील कोणालाही तो काही बोलला नाही. जवळच दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बाहेगव्हाण येथून तो सकाळी चालत वडवणीत आला. त्यानंतर त्याने जाळून घेतले.

मराठवाडा

समाजवादी पक्ष महापालिकेच्या ५० जागा लढविणार नांदेडः सद्या देशाची अवस्था वाईट असून, धर्माच्या नावाने सत्तेत आलेले भाजप गाय व...

07.00 PM

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

02.21 PM

माजलगाव (जि. बीड) : शहरालगतच असलेल्या अकरा पुनर्वसित गावामध्ये ऐन सणासुदीच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा  ...

12.09 PM