बीडमध्ये "झेडपी'च्या शिपायाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

बीड - बीड जिल्हा परिषदेत शिपाई म्हणून कार्यरत असलेले एकनाथ मिटकर यांचा शहरातील गांधीनगर भागात राहत्या घरी खून झाल्याचे मंगळवारी (ता. 29) सकाळी उघडकीस आले. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मिटकर यांना तीन मुली व एक मुलगा आहे. दोन मुलींचे लग्न झालेले असून, एक मुलगी आष्टी येथे दिलेली आहे. एकनाथ यांची पत्नी आणि मुलगा हे लग्नानिमित्त आष्टी येथे गेलेले होते. त्यामुळे मिटकर घरी एकटेच होते. त्यांच्या घरातून मंगळवारी दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्याने त्यांच्या घराचा दरवाजा उघडून पाहिला असता, त्यांचा मृतदेह दिसला. एकनाथ यांच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे निर्दशनास आले.

बीड - बीड जिल्हा परिषदेत शिपाई म्हणून कार्यरत असलेले एकनाथ मिटकर यांचा शहरातील गांधीनगर भागात राहत्या घरी खून झाल्याचे मंगळवारी (ता. 29) सकाळी उघडकीस आले. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मिटकर यांना तीन मुली व एक मुलगा आहे. दोन मुलींचे लग्न झालेले असून, एक मुलगी आष्टी येथे दिलेली आहे. एकनाथ यांची पत्नी आणि मुलगा हे लग्नानिमित्त आष्टी येथे गेलेले होते. त्यामुळे मिटकर घरी एकटेच होते. त्यांच्या घरातून मंगळवारी दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्याने त्यांच्या घराचा दरवाजा उघडून पाहिला असता, त्यांचा मृतदेह दिसला. एकनाथ यांच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे निर्दशनास आले. त्यानुसार एकनाथ यांचा कोणी तरी खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. 

Web Title: zp peons murder in beed

टॅग्स