शेअर करा 'माझा संकल्प'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

झपाट्याने बदलत असलेल्या जगात भक्कम टिकून उभे राहण्यासाठी आणि पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्या हाती ठेवण्यासाठी दृढ संकल्प हवेतच. सिगारेटचं व्यसन सोडण्यापासून ते मोबाईल कमी वापरण्यापर्यंत; आपला संकल्प काहीही असू शकतो. हवी, ती संकल्प पूर्ण करण्याची दृढता. 

आपल्याकडे आहे ही संकल्पाची दृढता? मग eSakal सोबत शेअर करा आपल्या संकल्पाचा सूर्य..

शनिवारच्या सूर्यास्तासोबत 2016 मावळतीला गेले. रविवारचा सूर्य 2017 ची पहाट घेऊन उगवतोय. या पहाटेसोबत अनेक आशा-आकांक्षाचे, नव्या उमेदीचे आणि नव्या संकल्पांचे सूर्यही उगवतील. 

कुणाचा शिक्षणाचा संकल्प असेल; कुणाचा असेल नवी स्किल्स शिकण्याचा...
कुणाचा समाजासाठी काही देण्याचा असेल; कुणाचा असेल आरोग्याचा...
कुणी व्यक्तिगत आयुष्यासाठी संकल्प करेल; कुणी भागासाठी, देशासाठी...

झपाट्याने बदलत असलेल्या जगात भक्कम टिकून उभे राहण्यासाठी आणि पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्या हाती ठेवण्यासाठी दृढ संकल्प हवेतच. सिगारेटचं व्यसन सोडण्यापासून ते मोबाईल कमी वापरण्यापर्यंत; आपला संकल्प काहीही असू शकतो. हवी, ती संकल्प पूर्ण करण्याची दृढता. 

आपल्याकडे आहे ही संकल्पाची दृढता? मग eSakal सोबत शेअर करा आपल्या संकल्पाचा सूर्य...

कदाचित आपल्यासारखाच संकल्प आणखी कुणाचा असू शकेल आणि संकल्पाच्या पूर्ततेत अनेकांचे हात लागू शकतील...पाहता पाहता संकल्प पूर्णत्वाकडे जाऊ शकतील...

संकल्प मांडण्यासाठी...