27 गावांतील नगरसेवक घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत 27 गावे परिसरातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी गावे महापालिकेतच राहावीत, अशी भूमिका घेतली आहे. काही दिवसांतच ते याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, यासंदर्भात भाजपसह सर्व पक्षांच्या एकूण 21 नगरसेवकांनी सह्यांचे निवेदन तयार केले आहे. याला नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटींवर दुजोरा दिला आहे. केडीएमसी निवडणुकी वेळी स्वतंत्र नगरपालिकेच्या मुद्द्यावरून संघर्ष समितीने भाजपशी हातमिळवणी केल्याने भाजप आणि संघर्ष समिती पुरस्कृत उमेदवारांना मतदारांनी अधिकाधिक कौल दिला होता.

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत 27 गावे परिसरातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी गावे महापालिकेतच राहावीत, अशी भूमिका घेतली आहे. काही दिवसांतच ते याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, यासंदर्भात भाजपसह सर्व पक्षांच्या एकूण 21 नगरसेवकांनी सह्यांचे निवेदन तयार केले आहे. याला नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटींवर दुजोरा दिला आहे. केडीएमसी निवडणुकी वेळी स्वतंत्र नगरपालिकेच्या मुद्द्यावरून संघर्ष समितीने भाजपशी हातमिळवणी केल्याने भाजप आणि संघर्ष समिती पुरस्कृत उमेदवारांना मतदारांनी अधिकाधिक कौल दिला होता. आता महापालिकेत राहूनच गावांचा विकास होऊ शकतो, अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. विशेष म्हणजे, निवडणुकी वेळी संघर्ष समिती पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांचाही यात समावेश आहे. मानपाडेश्‍वर मंदिर येथे संघर्ष समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत 27 गावांतील काही नगरसेवकही उपस्थित असल्याने त्यांची उपस्थिती केवळ नाममात्रच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. परिसरात होणारे ग्रोथ सेंटर, एमएमआरडीएची गावांबाबतची नेमकी भूमिका आणि इतर काही विकास प्रकल्पाबाबतही नगरसेवक मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते. 

Web Title: 27 villages corporator will meet CM