हिऱ्यांच्या व्यवसायात 81 कोटींची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

मुंबई - परदेशातून हिरे आयात करून चांगला मोबदला मिळवून देण्याच्या नावाखाली 81 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) पोलिसांनी गुरुवारी एका दलाला अटक केली. या प्रकरणी सुरतमधील आणखी तीन व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

कल्पेश दोशी (वय 49) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो कांदिवलीतील रहिवासी आहे. मालाड येथील हिरे व्यापारी हर्षद पटेल (वय 42) यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मालाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतचा तपास "ईओडब्ल्यू'कडे सोपवण्यात आला. "ईओडब्ल्यू'ने एक कोटी 30 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.