ठाण्यात आदित्य ठाकरे यांचा रोड शो 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

ठाणे -  शिवजंयती आणि रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत ठाणे शहरात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शो झाला. फटाक्‍यांच्या दणदणाटात, "कोण आला रे कोण आला ... युवासेनेचा वाघ आला', "जय भवानी जय शिवाजी' या घोषणांनी ठाणे दणाणून गेले होते. 

ठाणे -  शिवजंयती आणि रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत ठाणे शहरात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शो झाला. फटाक्‍यांच्या दणदणाटात, "कोण आला रे कोण आला ... युवासेनेचा वाघ आला', "जय भवानी जय शिवाजी' या घोषणांनी ठाणे दणाणून गेले होते. 

ठाणे येथील आनंदनगरपासून सुरू झालेला हा झंझावात मॉडेला नाका, महाराष्ट्र नगर, किसननगर क्रमांक 3, तीनहात नाका, श्रीनगर पोलिस चौकी, शांतीनगर, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, नितीन कंपनी, सिद्धेश्वर तलाव, ठाणे महानगरपालिका, आराधना सिनेमा, विष्णूनगर, गावदेवी, स्टेशन रोड ठाणे, एनकेटी कॉलेज मार्गे टेंभी नाका परिसरात हा रोड शो झाला. या सर्व परिसरातील रस्ते शिवसेनेच्या बाईकस्वारांनी भरून गेले होते. शिवसेनेच्या या रोड शोमुळे युवा सैनिकांनी ठाण्याचे वातावरण दणाणून सोडले. खांद्यावर शिवसेनेचा भगवा आणि हातात सेल्फी स्टिक घेतलेली तरुणाई जागोजाग दिसत होती. 

या रॅलीत पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, नरेश म्हस्के, प्रकाश शिंदे, जयश्री फाटक, सुखदा मोरे हे उमेदवार त्याचप्रमाणे पक्षाचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मुंबई

मुंबई -  "महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच राहणार आहे. जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार आहे, दानवे पण...

05.51 PM

डोंबिवली - आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी मंडप बांधताना आड येणारा वृक्ष तोडल्याची घटना समोर आल्याने पर्यावरणप्रेमी...

02.12 PM

कल्याण : रेल्वे प्रवासात अनेक कॉलेजचे विद्यार्थी मोबाईल वर बोलत लोकलमधील दरवाज्यात उभे राहून प्रवास करतात स्टंटबाजी करतात, रेल्वे...

11.45 AM