बोर्डी: तलावाच्या भिंतीचा निधी खर्च होणार की परत जाणार?

अच्युत पाटील
बुधवार, 25 एप्रिल 2018

बोर्डी : येथील खारीया तलावाच्या सभोवती संरक्षक भिंत बांधण्यासाठी अकरा लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला असला तरी तलावात पाण्याचा साठा भरपूर असल्याने हा निधी खर्च होणार की परत जाणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

संपूर्ण बोर्डी गावातील विहिरीतील पाण्याची पातळी कायम टिकवून ठेवणाऱ्या चौदा एकर जमिनिवरिल खारीया तलावाच्या सभोवती संरक्षक भिंत बांधण्यासाठी पहिल्या हप्त्यातील अकरा लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. परंतु तलावात भरपूर पाण्याचा साठा उपलब्ध असल्याने कामाला सुरुवात करण्यात अडचण निर्माण झाली आहे.

संबंधीत ठेकेदाराने तलावातील पाण्याचा उपसा करण्यासाठी ग्रमपंचायतीला दिलेल्या प्रस्तावावर मासिक सभेत चर्चा करण्यात आली असता पुढे भेडसावणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन पाणी उपसा करु नये असा ठराव करण्यात आल्याने, सरद विषय ग्रामसभेत चर्चेत आणावा अशी सुचना ठेकेदाराच्या हितचिंतक गटातुन आल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणत्याही परिस्थितीत तलावातील पाण्याचा उपसा करुन देणार नाही अशी भुमिका ग्रामपंचायत सदस्य यतीन सावे नाही घेतली आहे.

संरक्षक भिंतिचे पुढील वर्षात झाले तरी चालेल परंतु पुढे उन्हाळ्यात पाणी टंचाई टाळण्यासाठी तलावातील पाण्याचा साठा उपसला जाणार नाही अशी स्पष्ट भुमिका जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उप अभियंता भुपेंद्र धारणे यांनी घेतली आहे.

Web Title: Administration facing issue over construction of lake wall