एअरटेलचे अत्याधुनिक ब्रॉडबॅण्ड तंत्रज्ञान!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

मुंबई - अत्याधुनिक "व्ही फायबर' हे ब्रॉडबॅण्डचे अत्याधुनिक तंत्रज्ञान मुंबईतील ग्राहकांसाठी एअरटेलने आणले आहे. घरगुती गॅजेट्‌समध्ये एकाचवेळी अनेक उपकरणांसाठी जलद गतीने इंटरनेट वापरणे यामुळे शक्‍य होईल. व्ही फायबर तंत्रज्ञानामुळे 100 एमबीपीएस वेगाने ब्रॉडबॅण्ड इंटरनेटचा वेग वाढेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

सध्या एअरटेल ब्रॉडबॅण्ड वापरणाऱ्या ग्राहकांना व्ही फायबर तंत्रज्ञानासाठी मॉडेम बदलावा लागणार आहे. व्हेक्‍टरायजेशन या युरोपच्या तंत्रज्ञानावर आधारीत हे युरोपातील तंत्रज्ञान आहे. वायफायवर एकाचवेळी अनेक गॅजेट्‌सवर डाऊनलोडिंग तसेच अपलोडिंगही यामुळे शक्‍य होईल. चेन्नईत मिळालेल्या यशानंतर हे तंत्रज्ञान बुधवारपासून मुंबईत आणण्यात आले आहे. सध्याचे एअरटेलचे शंभर टक्के ब्रॉडबॅण्ड ग्राहक नवीन तंत्रज्ञान स्वीकारतील, अशी माहिती एअरटेल मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर बात्रा यांनी दिली. व्हॉईस तसेच लॅण्डलाईन कॉलिंगसारख्या सुविधाही ब्रॉडबॅण्ड तंत्रज्ञानामुळे शक्‍य होतील. या मॉडेमसाठी ग्राहकांना एक हजार रुपये खर्च करावे लागतील. ब्रॉडबॅण्डसाठी किमान मासिक दर 899 रुपये आहे.

मुंबई

मुंबई - हायप्रोफाइल दुहेरी हत्याकांडातील आरोपी चिंतन उपाध्यायने कारागृहात "स्वातंत्र्य' या विषयावर चित्र काढले आहे. ते चित्र...

02.48 AM

नवी मुंबई -: मतदार आम्हाला निवडून देतात. तेव्हा त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या धार्मिक स्थळांवर तुम्ही कशी कारवाई करता, अशा...

02.42 AM

मानखुर्द - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईच्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने विविध आगारांतून मोठ्या संख्येने जादा बस...

01.27 AM