'केसरी'च्या सेटवर अक्षयकुमारला दुखापत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

मुंबई - 'केसरी' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता अक्षयकुमारला दुखापत झाल्याचे समजते. सातारा जिल्ह्यात वाई येथे हे चित्रीकरण सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटातील क्‍लायमॅक्‍समध्ये ऍक्‍शन सीन शूट करताना त्याला ही दुखापत झाली.

त्यानंतर चित्रीकरण थांबविण्यात आले आहे. डॉक्‍टरांनी त्याला मुंबईला परतण्याचा सल्ला दिला होता; मात्र त्याने तेथेच थांबून आराम करण्याचा निर्णय घेतला आहे. "केसरी' या चित्रपटात अक्षयकुमार हवालदार ईश्वर सिंगची भूमिका साकारत आहे. सारगढी युद्धावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये दानशूर ईश्‍वर सिंगची कथा पाहायला मिळणार आहे.

Web Title: akshay kumar injured on kesari movie shooting