चर्चा सुरू होण्यापूर्वीच युतीमध्ये कलगीतुरा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

मुंबई - युतीचे जागावाटप सुरू होण्यापूर्वीच हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू झाले आहेत. पारदर्शकतेवर भर देण्याबद्दल बोलताच 20 वर्षे पारदर्शकता नव्हती का, असा सवाल शिवसेनेने भाजपला विचारला आहे. महापालिका निवडणुकीत जागावाटपापेक्षा पारदर्शकतेवर भर देण्याचे जाहीर करून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा पक्षाध्यक्ष अमित शहा बोलले तर बघू, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याकडे दुर्लक्ष केले होते.

गुरुवारी ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केल्यावर शिवसेनाही सरसावली आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून भाजपला चिमटा काढला आहे. 20 वर्षे आपण सोबत लढलो. मुंबईतील मतदारांनी विश्‍वासाने निवडून दिले. त्यामुळे पारदर्शकतेचा वेगळा अर्थ आम्हाला माहीत नाही, असा टोला त्यांनी लगावला. भाजपने शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव पाठवला आहे.

प्रस्तावावर चर्चा सुरू होण्यापूर्वीच युतीमध्ये पुन्हा तू-तू-मैं-मैं सुरू झाली आहे. त्यामुळे चर्चाही वादळीच ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

हा बॉक्‍स सिध्देश्‍वर डूकरे यांच्या बातमीत जोड म्हणून वापरला तरी चालेला

भाजपकडून प्रस्ताव
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर आम्हीही कामाला लागलो आहोत. युती झाल्यास ती सर्वत्र व्हावी, अशी आमची इच्छा आहे, असे शिवसेनेचे अनिल देसाई यांनी स्पष्ठ केले.

मुंबई

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या निष्काळजीमुळेच यंदाच्या निकालांची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त...

03.03 AM

नवी मुंबई  -मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते खारपाडा पुलापर्यंतच्या रस्त्याची चाळण झाल्याने यंदाही गणेशभक्तांना गचके, दणके...

02.27 AM

नवी मुंबई - मुंबई- गोवा महामार्गावर पळस्पे ते खारपाडा पुलापर्यंतच्या रस्त्याची खड्डे पडून अक्षरशः चाळण झाल्याने यंदाही...

01.27 AM