हत्तिणीवरील अत्याचारामुळे प्राणीप्रेमींमध्ये संताप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

मुंबई - भायखळा येथील जिजामाता उद्यानातील हत्तिणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंकुश टोचला जात आहे. याविषयी "सकाळ'मध्ये सोमवारी (ता.20) "अंकुशामुळे हत्तीण जखमी' ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यानंतर काही संस्थांनी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे (सीझेडए) दाद मागण्याचे ठरवले आहे.

जिजामाता उद्यानातील प्राण्यांचे हाल अनेक वर्षे सुरू आहेत. हत्तीच नव्हे, तर पक्षी, माकडे, अस्वल आदी सगळ्या प्राण्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. एका पेंग्विनचा मृत्यू झाल्यानंतरही पेंग्विनचा खेळ सुरूच आहे. या विरोधात केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने कडक कारवाई केली पाहिजे, अशा शब्दांत प्राणीप्रेमी आनंद सिवा यांनी संताप व्यक्त केला. मुळात प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला प्राण्यांची देखभाल कशी करावी, हेच माहीत नाही. हत्तीला अंकुश टोचणे हे क्रूर कृत्य आहे, असे ते म्हणाले.

वॉचडॉग फाऊंडेशनच्या गॉडफ्रे पिंग्मेंटा यांनी हत्तिणीवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून तपासाची मागणी केली आहे. पेंग्विनसाठी 64 कोटींची उधळण होत असताना इतर प्राण्यांच्या देखभालीबाबत हेळसांड होत आहे, असा आक्षेप त्यांनी नोंदवला. जखमी झालेल्या अनारकली हत्तिणीवर उपचार का झाले नाहीत, असा सवाल विचारत ऍण्टिसेप्टिक लावून तिची जखम लवकर भरून निघण्यासाठीही प्रयत्न होत नसल्याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला. जखम बरी न झाल्यास त्यात किडे होतील व गंभीर स्वरूपाचा आजार होईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: angry animal lovers on elephant torture