तुकाराम मुंढेंचा हायकोर्टात माफीनामा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

मुंबई - गोदावरी नदी तीरावरील बांधकाम तोडण्यास न्यायालयाची स्थगिती असतानाही त्यावर कारवाई केल्याप्रकरणी नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयासमोर माफीनामा सादर केला. सुनावणीदरम्यान नदी तीरावरील पाडलेले बांधकाम महापालिकेने तत्काळ स्वखर्चातून पुन्हा बांधून द्यावे, असेही आदेश न्यायालयाने पालिकेला दिले.

गोदावरी तीरावरील बांधकामे हटवल्याप्रकरणी अभिजित पाटील यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. याबाबत मुंढे यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. मात्र सकाळी झालेल्या सुनावणीत मुंढे गैरहजर राहिल्याने खंडपीठाने संताप व्यक्त केला. मुंडे यांनी दुपारी तीन वाजता न्यायालयात हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी याबाबत बिनशर्त माफी मागितली. यावर खंडपीठाने नोटीस मागे घेतली. याप्रकरणी सुनावणी 4 आठवड्यांनंतर ठेवण्यात आली आहे.

Web Title: An apology in Tukaram Mundhe's high court