वर्षा गायकवाड यांना संदेश पाठवणाऱ्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

मुंबई - कॉंग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांना अश्‍लील आणि धमकीचे संदेश पाठवणाऱ्या नरसिंग घोराला (वय 35) पोलिसांनी गुरुवारी (ता.9) अटक केली. 

नरसिंग याने कॉंग्रेसच्या एका माजी मंत्र्याला आणि उपजिल्हाधिकाऱ्यालाही धमकीचा संदेश पाठवल्याचे पोलिस तपासातून उघडकीस आले आहे. महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसने आपल्या नातेवाईकाला उमेदवारी न दिल्यामुळे आपण हा प्रकार केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. वर्षा गायकवाड यांना अश्‍लील संदेश आल्यानंतर त्यांनी वडाळा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी मोबाईल नंबर स्ट्रेस करून नरसिंगला धारावीतून अटक केली. 

अशाच एका गुन्ह्यातून नरसिंगची जामिनावर सुटका झाली होती. त्याने यापूर्वी नातेवाईकाला उमेदवारी नाकारल्याने कॉंग्रेसच्या एका माजी मंत्र्याला आणि महिला उपजिल्हाधिकाऱ्याला धमकीचा संदेश पाठवला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष-5 ने घोरालाला अटक केली होती. त्याच सिमकार्डवरून त्याने गायकवाड यांनाही हा संदेश पाठवला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील कांबळे यांनी दिली. 

Web Title: arrested the message sender