विमान वाहतूक कंपन्यांवर शिवसेना आणणार हक्‍कभंग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

मुंबई, - खासदार रवींद्र गायकवाड यांच्या वर्तनाचे समर्थन नाही. मात्र खासदाराला प्रवास नाकारणाऱ्या विमान कंपन्यांविरोधात हक्‍कभंग आणण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. खासदार संजय राऊत यांनी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिस्त मोडलेली आवडत नाही, असे स्पष्ट केले. मात्र प्रवासावरच बंदी घालण्याचा निर्णय अयोग्य आहे. त्या विरोधात हक्‍कभंग आणण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

दरम्यान, गायकवाड पळून गेलेले नाहीत, दोन्ही बाजू ऐकून योग्य तो निर्णय घ्यायला हवा, असेही राऊत म्हणाले. मंत्रालयात शेतकऱ्याला मारहाण झाली म्हणून मुख्यमंत्र्यांनाही काळ्या यादीत का, असा प्रश्‍नही त्यांनी केला. गायकवाड यांनी आज मुंबईला येणे टाळत दिल्लीहून निघालेल्या ऑगस्ट क्रांती एक्‍स्प्रेसमधून मध्येच उतरत उमरगा गाठले असल्याचे समजते.