शिवसेनेपासून सावध राहा! - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

ठाणे - पालघर निवडणुकीवेळी गाफील राहिल्याने मित्रपक्षाने आपलाच उमेदवार पळवून आपल्यासमोर उभा केला. त्यामुळे यापुढे शिवसेनेपासून सावध राहत येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते ठाण्यातील टिप टॉप प्लाझा येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

भाजपने मैत्रीला जपत मित्रपक्षाला वारंवार जागा सोडल्या आहेत. त्यामुळे कोकण हा भाजपचा गड असतानाही भाजप दुसऱ्या क्रमांकावर गेला. मात्र आता पालघर जिंकले आहे. या विजयाची पुनरावृत्ती कोकण पदवीधर मतदारसंघात करून कोकण जिंकायचे आहे. भाजपचे उमेदवार ॲड. निरंजन डावखरे यांचा विजय किमान ६० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मते घेऊन झाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी काम करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी भाजप कार्यकर्त्यांना केले.

भाजपला जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा तेव्हा पक्षाने आपली ताकद दाखवून दिली आहे. पनवेल पालिकेची निवडणूक युतीमध्ये लढण्याचे जाहीर झाले. त्यानुसार सह्यादेखील झाल्या; परंतु ऐन वेळेस पुन्हा मित्रपक्षाने युतीस नकार दिला. त्या स्थितीतही भाजप मोठ्या हिमतीने लढला आणि एकतर्फी विजय खेचून आणला. शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. 

Web Title: Awake from the Shiv Sena says Fadnavis