लोकांचा त्रास कमी झाला तर बाळासाहेबांना आनंदच होईल - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

मुंबई - 'मी वर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना उत्तर देईन,' असे जर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले असतील तर त्यांचे सर्वप्रथम आभारच मानतो. त्यांच्या मनात बाळासाहेबांबद्दल आदर असल्याचे यावरून दिसते. मात्र, सर्वसामान्य लोकांचा त्रास कमी होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना आनंद होईल, असा "मार्मिक' टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना लगावला. नोटाबंदीच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांनी शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाला खडे बोल सुनावल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

सर्वसामान्य माणसांना भेडसावणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडून अपेक्षित आहेत. ती जर उत्तरे सर्वसामान्य लोकांना मिळाली आणि त्यांचा खरोखरच त्रास कमी झाला तर, बाळासाहेबांनाही त्याचा जास्त आनंद होईल, असेही ठाकरे म्हणाले. या वेळी त्यांनी शिवसेनेच्या खासदारांना फैलावर घेणाऱ्या मोदींना अप्रत्यक्ष इशाराच दिला. मी अजूनही टोकाची भूमिका घेतलेली नाही. तशी वेळ येऊ नये, हीच अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.

या वेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारने मुस्लिम बॅंकांना परवानगी दिल्यावरून भाजपला लक्ष्य केले. जिल्हा बॅंकांमध्ये जुन्या नोटा स्वीकारणे अथवा त्या बदलून देण्यास परवानगी नाकारत आहात; पण दुसरीकडे मुस्लिम बॅंकांना परवानगी देत आहात. आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत, तेच कळत नाही, असेही ठाकरे म्हणाले.

मुंबई

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व...

05.48 AM

मुंबई - "लिव्ह इन रिलेशनशिप' साथीदाराने दूरध्वनी न घेतल्याने तिच्या पाच...

05.33 AM

मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा...

05.27 AM