वांद्रे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांची मुजोरी!

वांद्रे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांची मुजोरी!

मुंबई- राज्याचे परिवहन विभाग कार्यालय असलेल्या वांद्य्रातच रिक्षाचालक मुजोरी करत आहेत. वांद्रे रेल्वेस्थानकावरून बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांच्या मजोरीकडे परिवहन विभाग ‘अर्थपूर्ण’ कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे. परिवहन आयुक्तालयाच्या नाकाखाली टिच्चून ही मुजोरी जोरात सुरू आहे. 

वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेरून रिक्षा मिळविण्यासाठी मोठे कष्ट करावे लागतात. या ठिकाणी केवळ शेअर रिक्षाच आहेत. मीटरने येण्यासाठी एकही रिक्षाचालक तयार होत नाही. त्याचबरोबर रिक्षावाल्यांच्या मर्जीशिवाय तुम्हाला तुमच्या इच्छीतस्थळी पोहचणे कठीण होते. वांदे स्थानकाबाहेर प्रवाशांना रिक्षावाल्यांचा प्रचंड त्रास होत आहे. मीटरनुसार येण्यास रिक्षावाले नकार देतात. एखाद्या प्रवाशाने मीटरचा आग्रह धरल्यास त्याच्यावर सर्वजण धावून जातात. या ठिकाणी रात्री सर्रास विनामीटर वाहतूक केली जात आहे. मीटर बंद ठेवून प्रवाशांकडून मनमानी भाडेवसुली केली जात असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत.

रिक्षावाले मीटरने यायला नाकार देतात हे खरे आहे; मात्र प्रवाशांनी तक्रार केली तर आम्ही अशा रिक्षांवर कार्यवाही करतो. वांदे स्थानकाबाहेरून विविध ठिकाणी जाण्यासाठी शेअर रिक्षा आहेत. ठरलेल्या शेअर मार्गावर धावणारे रिक्षावाले मीटरने यायला नकार देतात. 
- शेखर चन्ने, परिवहन आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com