बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे धोरण

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 2 एप्रिल 2017

मुंबई - मुंबईत सामान्य नागरिकांसाठी 1925 मध्ये बांधण्यात आलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, दोन आठवड्यांत या चाळी नव्याने विकसित करण्याच्या कामाचे उद्‌घाटन होणार असल्याची घोषणा राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत केली. आमदार सुनील प्रभू यांनी 293 अन्वये दिलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते. या चर्चेत सहभागी होताना मुंबईतील शिवसेना व भाजप आमदारांनी जुन्या इमारती, उपकरप्राप्त इमारती व झोपडपट्टी पुनर्विकास याबाबतच्या समस्या मांडत सरकारने सुधारणा करण्याची मागणी केली होती. त्यावर बोलताना वायकर यांनी बीडीडी पुनर्विकासातून 207 चाळींतल्या 16203 सदनिकांच्या बांधणीचे काम सुरू होणार असल्याची माहिती दिली. उपकरप्राप्त 14,375 इमारती या जीर्ण झालेल्या असल्याने त्यांच्या विकासाचेही धोरण निश्‍चित झाल्याचे वायकर यांनी स्पष्ट केले.
Web Title: BDD chawl redevelopment policy