बेस्टची आजपासून भाडेवाढ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मुंबई - बेस्टने चार किलोमीटरपेक्षा अधिक प्रवासासाठी किमान एकपासून 12 रुपयांपर्यंत भाडेवाढ केली आहे. ती उद्यापासून (ता. 11) लागू होणार आहे. दैनंदिन, मासिक पास व वातानुकूलित बस भाड्यातही वाढ करण्यात आली आहे. प्रशासनाचा हा निर्णय मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावणारा ठरणार आहे. 

बेस्ट आर्थिक संकटात आहे. त्यामधून बेस्टला बाहेर काढण्यासाठी भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावाला बेस्ट समिती व पालिका सभागृहाने मंजुरी दिली आहे. मुंबई मेट्रो विभागीय वाहतूक प्राधिकरणाकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने भाडेवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. 

पालिका आयुक्तांनी बेस्टला मदत करण्यास नकार दिल्यानंतर बेस्टला अखेर भाडेवाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी हा प्रस्ताव वाहतूक प्राधिकरणाकडे (एमएमआरटीए) पाठविला होता. 

दैनंदिन बस पासमध्ये 10 रुपयांची वाढ केली आहे; तर विद्यार्थ्यांसाठीच्या दैनंदिन पासात पाच रुपयांची वाढ केली आहे. 

मासिक पास महागले 
- 6 किलोमीटर अंतराच्या मासिक पासाचे भाडे 620 वरून 660 रुपये 
- 20 किलोमीटरच्या अंतरात मासिक पासाचे भाडे एक हजार 150 वरून एक हजार 500 रुपये 
- विद्यार्थ्यांचा मासिक पास 200 ते 350 रुपये 

अशी होणार भाडेवाढ 

किलोमीटर विद्यमान दर भाडेवाढ 
2 8 8 
4 10 10 
6 14 15 
8 16 18 
10 18 22 
12 20 25 
14 22 28 
17 24 32 
20 26 34 
25 28 37 
30 30 42 
35 36 47 

Web Title: Best fare from today