'बेस्ट' प्रवास महागण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

मुंबई - "बेस्ट'च्या खालावणाऱ्या आर्थिक स्थितीचा अहवाल प्रशासनाने मुंबई महापालिकेला शनिवारी सादर केला. त्यात "बेस्ट'चे भाडे दोन रुपयांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

आर्थिक संकटात असलेल्या "बेस्ट'ला जगवण्यासाठी आर्थिक मदत करण्याचा शब्द मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

"बेस्ट'ची आर्थिक प्रकृती सुधारण्यासाठी आस्थापना खर्चात कपात करणे, बसच्या फेऱ्यांमध्ये फेरबदल करणे, बस ताफा कमी करणे, नवीन कर्मचारी भरती बंद करणे, अशा सूचना असलेला आराखडा महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी आज गटनेत्यांच्या बैठकीत सादर केला. सध्याचा आस्थापना खर्च सुमारे दीडशे कोटी आहे. त्यात कपात करण्यात येणार आहे.