बेस्ट कामगारांना मिळाला पगार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

मुंबई - अखेर बेस्टच्या 40 हजार कामगारांना मंगळवारी पगार मिळाला. बुधवारी उर्वरित दोन हजार अधिकाऱ्यांना पगारापोटी 180 कोटी दिले जातील. हा फेब्रुवारीचा पगार 10 तारखेऐवजी 21 तारखेला मिळाला आहे. बेस्ट आर्थिक संकटात असल्याने कामगारांना पगार देण्यास उशीर झाला, असे बेस्टच्या सूत्रांनी सांगितले.

पगार वेळेवर न मिळाल्यामुळे कामगार नाराज झाले आहेत. महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या मध्यस्थीने पगार झालेल्या बैठकीला सभागृह नेते यशवंत जाधव, बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता उपस्थित होते.

Web Title: best worker payment