शिवसेना शाखाप्रमुखांचा भाजपमध्ये प्रवेश

Bhiwandi news Mumbai news Marathi news Shivsena BJP
Bhiwandi news Mumbai news Marathi news Shivsena BJP

भिवंडी : ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. भिवंडी तालुक्‍यातून अनेक पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत असतानाच आज शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुखांनी भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. शिवसेनेचे पिंपळघर येथील शाखाप्रमुख आणि ग्रामपंचायत सदस्य हिरानंद पाटील आणि सरवलीपाडा येथील शाखाप्रमुख श्रीराम चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार पाटील यांच्याकडून भिवंडी तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील दळणवळणासोबतच नागरी सुविधांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यांची विकासाची दृष्टी लक्षात घेऊन त्यांच्यासह कार्य करण्यासाठी शिवसेनेबाहेर पडलो आहोत, अशी प्रतिक्रिया दोघा शाखाप्रमुखांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, राम माळी, भरत पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com