भाजपच्या महामेळाव्यामुळे मुंबईत प्रचंड वाहतुककोंडी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

बस, जीपमधून कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी पोचण्यासाठी घाई करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. तर काही ठिकाणी बाचाबाचीचा प्रकार घडले आहेत. भाजपच्या या महामेळाव्यामुळे झालेल्या वाहतुककोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मुंबई : स्थापना दिनानिमित्त बीकेसीच्या मैदानावर होत असलेल्या भाजपच्या महामेळाव्यामुळे आज सकाळपासूनच चेंबूर, बांद्रा, दादर आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने संतप्त नागरिकांनी बांद्रा येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या बस थांबवल्या. त्यामुळे तणाव निर्माण झाला. भाजपच्या या महामेळाव्यामुळे मुंबईकरांना प्रचंड वाहतुककोंडीला सामोरे जावे लागत आहे. 

बस, जीपमधून कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी पोचण्यासाठी घाई करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. तर काही ठिकाणी बाचाबाचीचा प्रकार घडले आहेत. भाजपच्या या महामेळाव्यामुळे झालेल्या वाहतुककोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामेळाव्यासाठी भाजपचे लाखो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे बांद्रा आणि परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. 

पश्चिम द्रुतगती मार्गावर तर कालपासूनच वाहतूक कोंडी होण्यास सुरवात झाली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे काल (गुरुवार) आगमन झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळ ते बीकेसीपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली होती. त्यामुळे सुमारे पाच तास वाहतूक खोळंबली होती.

Web Title: BJP Huge Rally Mumbai Traffic Jam Road Traffic