भाजपची अमराठी मतांसाठी धडपड 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

मुंबई - मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपची अमराठी मतांसाठी धडपड सुरू आहे. यासाठी कार्यकारिणीवर अमराठी भाषिकांची सर्वाधिक वर्णी लावली आहे. मुंबई भाजपची नवी कार्यकारिणी मुंबई भाजपचे अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी जाहीर केली. यामध्ये सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये होत आहे. या निवडणुकीत मराठी मतांवर अवलंबून राहण्यापेक्षा उत्तर भारतीय, बिहारी, गुजराती, जैन, मारवाडी आदी समाजांच्या मतांवर डोळा ठेवून मुंबई भाजप कार्यकारिणी जाहीर केली असल्याचे सांगितले जाते. मुंबईत मराठी मतांचे प्रमुख दावेदार म्हणून शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष असताना भाजपला पाहिजे तेवढी मदत होणार नाही, याचा अंदाज बांधून ही कार्यकारिणी जाहीर केल्याचे सांगितले जाते. 

नव्या "टीम'मध्ये युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी मोहित कंबोज यांची नियुक्‍ती करण्यात आली असून, महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी पुन्हा शलाका साळवी यांनाच संधी देण्यात आली आहे. तर, उत्तर भारतीय मोर्चाच्या अध्यक्षपदी संतोष पांडे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

मुंबई

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकाल दिरंगाईमुळे विद्यार्थी आणि पालकांचा मानसिक छळ होत असल्याने शिक्षणमंत्र्यांवर मानसिक छळाचा...

08.09 AM

पनवेल  -  कंपनीतील प्रदूषणामुळे परिसरातील मानवी वस्तीबरोबरच श्‍वान- चिमण्यांसारख्या मुक्‍या प्राण्यांवरही विपरीत...

06.03 AM

नवी मुंबई - महापालिकेच्या विधी विभागात वकील आणि सामाजिक कार्यकर्ते यांची एक साखळी तयार झाली आहे. ती महापालिकेची लूट करत आहे...

04.33 AM