मुदतीत नोंदणी न केल्यास सुरक्षा एजन्सी काळ्या यादीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

मुंबई - कामगार कायदे धाब्यावर बसवणाऱ्या सुरक्षा एजन्सीवर कारवाई करण्याचे निर्देश कामगारमंत्री संभाजीराव पाटील यांनी आज दिले आहेत. महाराष्ट्रात 20 लाख सुरक्षा कामगार असल्याचा अंदाज सरकारने नेमलेल्या तपासणी पथकाने काढला असला तरी प्रत्यक्षात केवळ 17 हजार रक्षकांची नोंद करण्यात आली आहे. कामगार कायद्याच्या लाभापासून रखवालदारांना वंचित ठेवण्यासाठी सुरक्षा एजन्सी नोंदणी करत नाहीत, अशी खंत व्यक्‍त करून निलंगेकर पाटील म्हणाले, 'येत्या 15 दिवसांत सर्व सुरक्षा एजन्सींनी नोंदणी करण्याचा निर्णय सुरक्षा रक्षक मंडळाने घेतला आहे. या कालावधित नोंदणी न करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकले जाईल. या निर्णयाचे पालन अधिकारी, कर्मचारी करतात किंवा नाही ते पाहण्यासाठी भरारी पथकही नेमण्यात आले आहे.'