७० वर्षांपूर्वीचा पूल पडायला आला; पण नूतनीकरणाचा मुहूर्त नाहीच!

अच्युत पाटील
बुधवार, 25 एप्रिल 2018

बोर्डी : घोलवड-बोर्डी गावाला जोडणार्‍या मुख्य मार्गावरील खुटवाडीवरील पूल धोकादायक झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून नूतनीकरणाला मुहूर्त सापडत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

तब्बल ७० वर्षांपूर्वी बांधलेल्या खुटवाडीवरील पुलाची दुरावस्था झाली आहे. पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून स्लॅब कोसळण्याच्या मार्गावर आहे. पुलाचे दगडी खांब पोकळ झाल्यामुळे कमकुवत झाले आहेत. 

पुलाची वजन पेलण्याची क्षमता नसतानाही डहाणू औष्णिक  वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणारी राख वाहतूक करणारे पन्नास टन वजनाचे डंपर याच मार्गाने गुजरातला नेले जात आहेत.

पाच वर्षापूर्वी सत्तर लक्ष रुपयांची खर्चाची तरतूद करून नवीन पुल बांधण्यासाठी निवीदा काढण्यात आल्या होत्या. परंतु ठेकेदारांच्या आपाआपसातील वादात काम सुरू झाले नाही. आॅगस्ट 2016 मध्ये नाबार्डकडून दीड कोटी रुपये अर्थसाह्य घेऊन नवीन पुल बांधण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यानी पालकमंत्री विष्णू सावरा,खासदार चिंतामण वनगा,आमदार पास्कल धनारे यांच्या बोर्डी दौऱ्याच्या वेळी दिली होती.

परंतु त्यानंतर या विषयाकडे नाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व पालकमंत्री महाशयानी लक्ष दिलेले नाही.

सद्यस्थितित पुलाची झालेली दुरावस्था म्हणजे धोक्याची घंटा आहे परंतु बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेचे सोंग घेत असल्याने प्रचंड नाराजी पसरली आहे.

Web Title: Bridge connecting Gholwad and Bordi awaits structural renovation

टॅग्स