उमेदवारांच्या कुंडल्या मतदारांच्या चर्चेचा विषय

- गोविंद तुपे
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई - अरे हा तर अडाणीच आहे. हा तर करोडपती आहे. अशा प्रकारचे उद्गार मतदान केंद्राबाहेरील रांगेत ऐकायला मिळत होते.

निवडणूक आयोगाने या वर्षी मतदान केंद्राबाहेरच उमदेवारांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या कुंडल्याच लावल्या होत्या. त्यामुळे उमेदवारांच्या व्यक्तिगत आयुष्याचा लेखाजोखा सर्वसामान्य मतदारांच्या चर्चेचा विषय बनला होता.

मुंबई महापालिका निवडणुकीत 227 जागांसाठी 2275 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील महत्त्वाच्या माहितीचा गोषवारा त्या-त्या प्रभागातील मतदान केंद्राबाहेर लावण्यात आला होता. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, स्थावर आणि जंगम मालमत्ता, त्याच्यावरील गुन्हे आणि त्याला झालेली शिक्षा असा सर्व तपशील मतदान केंद्राबाहेर लावण्यात आला होता. आपापल्या प्रभागातील उमेदवारांची ही कुंडली वाचून मतदार उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया व्यक्‍त करीत होते. अरे हा अडाणी आहे, हा तर जाम पैसेवाला दिसतोय आणि हा तर गुंडच वाटतोय, असे उद्‌गार मतदारांच्या मुखातून निघत होते.

मुंबईतील 20 उमेदवार अशिक्षित आहेत. पाचवीपेक्षा कमी शिकलेले उमदेवार 100 च्या घरात आहेत; तर नववी पास उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे.

Web Title: candidates spiral voters topic of discussion