व्यापाऱ्यांसाठी सुट्या पैशांची स्वतंत्र यंत्रणा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

मुख्यमंत्र्यांचे रिझर्व्ह बॅंकेशी चर्चा करण्याचे आश्‍वासन
मुंबई - बाजारात चलनपुरवठा करण्याबरोबरच ग्राहकांना, तसेच व्यापाऱ्यांनाही कर सवलत देण्याची मागणी फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने राज्य सरकारकडे केली आहे. फेडरेशनच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. 22) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. बॅंकांमध्ये व्यापाऱ्यांसाठी सुट्या पैशांची स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेशी बोलण्याचे आश्‍वासन फडणवीस यांनी व्यापाऱ्यांना दिले.

चलन तुटवड्याने हाती पैसाच नसल्याने ग्राहकांच्या क्रयशक्तीवर परिणाम झाला आहे. परिणामी, राज्यातील किरकोळ आणि घाऊक व्यापाराला फटका बसला आहे. चलनाचा सुरळीत पुरवठा करतानाच जर केंद्राने कर सवलत जाहीर केली, तर ग्राहकांमध्ये पुन्हा खरेदीचा उत्साह निर्माण होऊन व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळेल, असे मत असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी व्यक्त केले. या संदर्भात केंद्र सरकारबरोबर चर्चेचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे शहा यांनी सांगितले. याशिवाय कर मर्यादा वाढविण्यात यावी, डेबिट आणि क्रेडिट कार्डावरील व्यवहारांवर आकारण्यात येणारे शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कर सवलती संदर्भात केंद्र सरकारशी बोलून सकारात्मक तोडगा काढू. त्याचबरोबर बॅंकांमध्ये व्यापाऱ्यांना सुट्या पैशांसंदर्भात स्वतंत्र यंत्रणा सुरू करण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेशी बोलू, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना दिले.

परवाने नूतनीकरणासाठी जुन्या नोटा स्वीकाराव्या
आहार असोसिएशनने परवाने नूतनीकरण प्रक्रिया डिसेंबरमध्ये होताना अन्य शासकीय कर ज्या पद्धतीने पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांमध्ये स्वीकारण्यात येत आहेत, त्या पद्धतीने परवाने नूतनीकरण करतानाही जुन्या नोटा स्वीकाराव्यात अशी मागणी केली. तसेच छोट्या किमतीच्या नोटा जास्तीत जास्त चलनात आणाव्यात, अशी मागणी केंद्र सरकारकडे करावी, अशी विनंती आहार संघटनेचे अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी या वेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.

मुंबई

लालठाणे- 'गाव करेल ते राव काय करेल' या उक्तीची प्रचिती सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला अगदीच नऊ किलोमीटर अंतरावर वसलेल्या...

07.30 PM

कल्याण : गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव मंडळ मोठ्या प्रमाणात महाप्रसाद ठेवतात. यावेळी नागरिकांच्या आरोग्याला घातक...

03.36 PM

सफाळे : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 4 वर्षे, तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला 29 महिने होऊनही सीबीआयपासून...

03.12 PM