भुजबळांना पुन्हा कारागृहात पाठविण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

अखेर आज ईडीच्या विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीत त्यांना पुन्हा तुरुंगात पाठविण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले. तसेच ऍन्जिओग्राफी करण्याची भुजबळांची तयारी असेल, तर फक्त ऑपरेशनचे डॉक्टर कोण याचा निर्णय घेण्याची भुजबळ यांना मुभा देण्यात आली आहे.

मुंबई - बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी अटक असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश आज (बुधवार) सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) विशेष न्यायालयाने दिले. आजच भुजबळ यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

हृदयाचे ठोके अनियमित असल्यामुळे भुजबळांना ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ऑर्थर रोड तुरुंगातून जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले होते. यापूर्वीही अनेकदा भुजबळांना याच तक्रारीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. जे. जे. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी तपासण्याही केल्या. त्यासाठी सुमारे 20 दिवस भुजबळ खासगी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल होते. तेथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल यांनी त्यांच्यावर ऍन्जिओग्राफी करण्याची आवश्‍यकता असल्याचे 27 नोव्हेंबरलाच तुरुंग प्रशासनाला कळवले आहे. 10 दिवसांनी भुजबळांना 7 डिसेंबरला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. तिथे पाच दिवस उलटल्यानंतर भुजबळांनी ऍन्जिओग्राफी करण्यास नकार दिला.

अखेर आज ईडीच्या विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीत त्यांना पुन्हा तुरुंगात पाठविण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले. तसेच ऍन्जिओग्राफी करण्याची भुजबळांची तयारी असेल, तर फक्त ऑपरेशनचे डॉक्टर कोण याचा निर्णय घेण्याची भुजबळ यांना मुभा देण्यात आली आहे.

मुंबई

मुंबई -  "महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच राहणार आहे. जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार आहे, दानवे पण...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

डोंबिवली - आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी मंडप बांधताना आड येणारा वृक्ष तोडल्याची घटना समोर आल्याने पर्यावरणप्रेमी...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कल्याण : रेल्वे प्रवासात अनेक कॉलेजचे विद्यार्थी मोबाईल वर बोलत लोकलमधील दरवाज्यात उभे राहून प्रवास करतात स्टंटबाजी करतात, रेल्वे...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017