उपचार न मिळाल्याने गोवंडीतील मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई - डॉक्‍टरांच्या आंदोलनामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने इरशाद शेख (वय 11) या गोवंडीतील मुलाचा गुरुवारी (ता. 23) सायन रुग्णालयात मृत्यू झाला. इरशादला कांजण्या झाल्याने सकाळपासून ताप होता. त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्‍टरांच्या आंदोलनामुळे तेथे त्याच्यावर उपचार झाले नाहीत. तीन तास त्याचे नातेवाईक रुग्णालयात ताटकळत होते. इरशादची प्रकृती गंभीर झाल्याने नातेवाइकांनी तत्काळ सायन रुग्णालय गाठले. मात्र तेथे उपचार सुरू होण्यापूर्वीच इरशादचा मृत्यू झाला. डॉक्‍टरांच्या हलगर्जीमुळे इरशादचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला. याबाबत पोलिसांत तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
टॅग्स