वीजवाहिनीच्या धक्‍क्‍याने तरुणाचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

सफाळे - तुटलेल्या वीजवाहिनीचा शॉक लागून माकुणसार येथील विपुल रघुनाथ वर्तक (वय 31) या तरुणाचा मृत्यू झाला. विपुल वर्तक यांचा दुग्ध व्यवसाय होता. ते आपल्या मोटारसायकलवरून शुक्रवारी (ता. 28) सकाळी 6.30 च्या सुमारास दुधाच्या किटली घेऊन स्टेशनवर जात होते. त्या वेळी रस्त्यावर वीजवाहिनी तुटून पडल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही, त्यामुळे त्यांना जोरदार झटका लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा सफाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विपुल यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, तीन वर्षांचा मुलगा व गेल्याच आठवड्यात त्यांना मुलगी झाली आहे.

सफाळे - तुटलेल्या वीजवाहिनीचा शॉक लागून माकुणसार येथील विपुल रघुनाथ वर्तक (वय 31) या तरुणाचा मृत्यू झाला. विपुल वर्तक यांचा दुग्ध व्यवसाय होता. ते आपल्या मोटारसायकलवरून शुक्रवारी (ता. 28) सकाळी 6.30 च्या सुमारास दुधाच्या किटली घेऊन स्टेशनवर जात होते. त्या वेळी रस्त्यावर वीजवाहिनी तुटून पडल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही, त्यामुळे त्यांना जोरदार झटका लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा सफाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विपुल यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, तीन वर्षांचा मुलगा व गेल्याच आठवड्यात त्यांना मुलगी झाली आहे. घरामधला एकमेव कर्ता पुरुष अपघातात गेल्याने कुटुंबाची फार मोठी हानी झाली आहे. विपुल यांच्या कुटुंबीयांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख नागेश वर्तक यांनी केली आहे. दरम्यान, महावितरणच्या गलथानपणामुळे या परिसरातील अनेक ठिकाणी वीजवाहिन्या व खांब जीर्ण झाले, असून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.