वाऱ्यांची दिशा बदलल्याने थंडीने घेतला "ब्रेक'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

मुंबई - गेल्या आठवड्यात गारठवणाऱ्या थंडीचा अनुभव घेतल्यानंतर मुंबईसह राज्यात थंडीने ब्रेक घेतला आहे. शुक्रवारपासून कमाल तापमान तिशीपार जाताच आता किमान पाराही चढू लागला आहे. रविवारी (ता. 22) कमाल 33 आणि किमान 19 अंश सेल्सिअस तापमान राहील, असा अंदाज असल्याने थंडीचा गारेगार अनुभव मिळणार नाही. शुक्रवारपासून कमाल तापमान तीन अंशांनी वाढून 32 अंशांवर पोहचले आहे.

उत्तरेतील बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्‍मीर गोठले आहे; परंतु मुंबईत उत्तरेकडून थंडी वाहून आणणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलली आहे. काही दिवसांत किमान पारा 15 अंशांच्या आसपास असल्याने रात्री जाणवणारा गारठा कायम होता; परंतु 15 अंशांच्या पुढे पारा सरकताच बुधवारपासून थंडीची हुडहुडी कमी झाली. त्यातच गुरुवारपासून कमाल तापमानही पुढे सरकले. परिणामी, आठवड्याच्या शेवटी पुन्हा हुडहुडी भरवणारी थंडी येईल, ही आशा फोल ठरली आहे. नैऋत्य दिशेऐवजी आग्नेय दिशेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे सध्या मुंबईत प्रभावी ठरले आहेत.

रविवारी तापमानाचा अंदाज (अंश सेल्सिअस)
कमाल- 33
किमान- 19

सोमवारी तापमानाचा अंदाज (अंश सेल्सिअस)
कमाल- 34
किमान- 20

मुंबई

मुंबई - अकार्यक्षम ठरलेल्या "बेस्ट'च्या 550 बस वर्षभरात भंगारात काढल्यानंतर आता 453 बस भंगारात काढण्याचा प्रस्ताव बेस्ट...

04.24 AM

नवी मुंबई  - केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील सर्वांत जास्त प्रदूषित हवा असणाऱ्या 17 शहरांची यादी जाहीर केली...

03.42 AM

मुंबई - हायप्रोफाइल दुहेरी हत्याकांडातील आरोपी चिंतन उपाध्यायने कारागृहात "स्वातंत्र्य' या विषयावर चित्र काढले आहे. ते चित्र...

02.48 AM