भटक्‍या कुत्र्यांचा त्रास होणाऱ्यांना नुकसानभरपाई द्यायला हवी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

मुंबई उच्च न्यायालयाचे मत

मुंबई  - भटक्‍या कुत्र्यांच्या चाव्यामुळे बाधित झालेल्या किंवा मृत झालेल्या पीडितांच्या वारसांना राज्य सरकार नुकसानभरपाई देणार का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 27) केली. तसेच भटक्‍या कुत्र्यांचा त्रास होणाऱ्यांना नुकसानभरपाई द्यायला हवी, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले.

मुंबई उच्च न्यायालयाचे मत

मुंबई  - भटक्‍या कुत्र्यांच्या चाव्यामुळे बाधित झालेल्या किंवा मृत झालेल्या पीडितांच्या वारसांना राज्य सरकार नुकसानभरपाई देणार का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 27) केली. तसेच भटक्‍या कुत्र्यांचा त्रास होणाऱ्यांना नुकसानभरपाई द्यायला हवी, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले.

सांगलीमधील मारुती हाले यांच्या पाच वर्षांच्या मुलाचा कुत्रा चावल्यामुळे काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाल्याची घटना घडली. भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत सांगली-मिरज नगरपालिका अयशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे पालिकेने 20 लाखांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी हाले यांनी केली होती. नगरपालिकेने याबाबत कार्यवाही न केल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. गुरुवारी न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. राज्य सरकारने भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करायला हवा. भटक्‍या कुत्र्यांमुळे जर नागरिकांना गंभीर त्रास होत असेल तर त्यावर नुकसानभरपाईदेखील द्यायला हवी, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. याबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती नियुक्त केली आहे. तसेच नुकसानभरपाई देण्याबाबतही राज्य सरकार विचार करीत असून, लवकरच अध्यादेश काढण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी वकील पी. पी. काकडे यांनी खंडपीठाला दिली. याचिकेवर पुढील सुनावणी दिवाळीनंतर होणार आहे.

मुंबई

बेलापूर - सीबीडी बेलापूर येथील बेलापूर जंक्‍शन हा उरण रोडवरील महत्त्वाचा चौक आहे. या मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने येथील...

05.03 AM

नवी मुंबई - जागतिक युवा सप्ताहाचे औचित्य साधत सामाजिक संस्था, सरकारी रुग्णालये आणि विद्यालयांत एड्‌स जनजागृती कार्यक्रमाचे...

04.33 AM

कल्याण - प्लॅस्टिकची अंडी, चीनी अंडी, अंड्यात प्लास्टिक निघाले, अशा तक्रारींच्या धर्तीवर अन्न व औषध ठाणे विभागाच्या पथकाने...

04.03 AM