शिवसेना-'सप' कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्रात बाचाबाची

- कुणाल जाधव
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई - पश्‍चिम उपनगरातील गोवंडी परिसरातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या मतदान केंद्रात शिवसेना आणि समाजवादी पक्षाचे (सप) कार्यकर्ते एकमेकांना भिडले. "सप'च्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात ठाण मांडून पक्षाला मतदान होण्यासाठी दमदाटी केली, असा आरोप करीत शिवसेना कार्यकर्त्यांनी केंद्रात धाव घेतली. या वेळी शिवीगाळ आणि बाचाबाचीमुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून कार्यर्त्यांना आवरले.

मुंबई महापालिकेसाठी गोवंडी परिसरातील 137 क्रमांकाच्या प्रभागातून पाच उमेदवार रिंगणात आहेत. या मुस्लिमबहुल प्रभागात सपच्या आयेशा शेख आणि शिवसेनेच्या संध्या आंबेकर यांच्यात खरी लढत आहे. याच प्रभागातून सलग दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या नूरजहॉं शेख या आयेशा यांच्या आई आहेत. आयेशा यांचे वडील रफिक यांच्यावर स्थानिक पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. रफिक शेख यांनी मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

Web Title: confussion in shivsena-sp activists