नोटाबंदीविरोधात कॉंग्रेस रस्त्यावर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 डिसेंबर 2016

मुंबई - नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिकांच्या दैनंदिन जगण्यावरच निर्बंध आल्याने कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या निर्णयाविरोधात पाच जानेवारीला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर पक्ष आंदोलन करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 दिवसांत सगळे सुरळीत होईल, असे सांगितले होते. मात्र, अद्याप नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या समस्या "जैसे थे' आहेत. याबाबत मंगळवारी परळमधील "टिळक भवन'मध्ये कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या वेळी आगामी निवडणुकांसोबतच नोटाबंदीविरोधात आक्रमक होण्याची रणनीती आखण्यात आली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महिला आघाडी व युवक कॉंग्रेस थाळीनाद आंदोलन करणार आहे. जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने नोटाबंदीविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, मधुकर चव्हाण यांच्यासह इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.

Web Title: Congress on Road against denominations