"नथुराम गोडसे'चा खेळ राजकीय दरबारी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 जानेवारी 2017

मुंबई - नथुराम गोडसेवरील नाटकासाठी पोलिसांनी गोळीबाराची जाहीर धमकी देण्याच्या प्रकरणी कॉंग्रेस आक्रमक झाली असून, या वादाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले. नागपूर पोलिस आयुक्तांवर कारवाई न झाल्यास त्यांना "जनरल डायर'ची पदवी देऊन सत्कार करणार असल्याची घोषणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली असताना फडणवीस सरकार गोडसेच्या विचारसरणीचा अवलंब करत असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी बुधवारी केली.

विखे पाटील यांनी आज दुपारी टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना या घटनेवरून राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. स्वयंघोषित राष्ट्रभक्तांच्या कार्यकाळात शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाहीर फलक लावून गोळीबाराची धमकी देण्याची ही घटना ब्रिटिश राजवटीची आठवण करून देणारी आहे, या शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

आपल्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनात एखाद्या साध्या आंदोलनात गोळीबाराची जाहीर धमकी देणारा फलक घेऊन पोलिस उभे असल्याचे मी कधीही पाहिले नाही. ही कार्यपद्धती पाहता पोलिसांना नागपुरात जालियानवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती करायची होती की काय, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. "नथुराम' नाटक आणि तत्पूर्वी "आरबीआय'समोरील आंदोलनाच्या वेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर जनरल डायरसारखी दडपशाही करण्याची नागपूर पोलिसांची मानसिकता दिसून आली होती, याचीही आठवणही त्यांनी करून दिली.

Web Title: Congress spokesperson Sachin Sawant criticized