पेंग्विनच्या घरांना तडे गेल्याचा दावा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

मुंबई - भायखळा येथील जिजामाता उद्यानातील पेंग्विनना पोहण्यासाठी केलेल्या तरण तलावाच्या बांधकामाला तडे गेले आहेत. कंत्राटापासून वादग्रस्त ठरलेले हे बांधकाम नव्या वादात सापडले आहे. यावरून आता चांगलेच राजकारण रंगत असून, भाजपने शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. 

पालिकेने 40 कोटींचा खर्च करून पेंग्विनसाठी बांधकाम केले आहे. त्यात पेंग्विनना राहण्यासाठी 1800 चौरस फुटांची स्वतंत्र जागा आहे. तेथील पाण्याखालील सिमेंट कॉंक्रिटला तडे गेले आहेत. मात्र हे तडे नसून डिझाईन असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने हा दावा फेटाळून लावला आहे. पारदर्शक काचेतून हे तडे सहज दिसत आहेत, असे भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी म्हटले आहे. पेंग्विन पोहत असलेल्या ठिकाणी केलेल्या ओबडधोबड बांधकामाला पडलेल्या तड्यांतून पाणी झिरपून पेंग्विनला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.