महिलेसोबत अश्‍लील वर्तन करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुंबई - महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी हरिराम बिष्णोई (48) याला गुरुवारी अटक केली. महिलेसोबत अश्‍लील प्रकार करणाऱ्या या आरोपीचे एका वाहनचालकाने मोबाईलवर चित्रीकरण करू महिलेला दाखवल्यानंतर हा संपूर्ण प्रकार पुढे आला.

मुंबई - महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी हरिराम बिष्णोई (48) याला गुरुवारी अटक केली. महिलेसोबत अश्‍लील प्रकार करणाऱ्या या आरोपीचे एका वाहनचालकाने मोबाईलवर चित्रीकरण करू महिलेला दाखवल्यानंतर हा संपूर्ण प्रकार पुढे आला.

पीडित महिला ही त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास चर्चगेट परिसरात आली होती. त्या वेळी त्यांचे दीर व दिराच्या सासरचे पाहुणे फूटपाथवर बोलत उभे होते. त्यांच्यापासून थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या पीडित महिलेशी एक व्यक्ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होती. त्याने एक-दोन वेळा धक्काही दिला; पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तो व्यक्ती तिथून निघून गेली; पण फूटपाथच्या शेजारी उभ्या स्वीफ्ट कारच्या चालकाने हा संपूर्ण प्रकार पाहिला व त्या व्यक्तीच्या अश्‍लील कृत्याचे चित्रीकरण त्याच्या मोबाईलद्वारे केले. त्यानंतर ही चित्रफीत त्याने या महिलेला दाखवली. त्या वेळी ही व्यक्ती महिलेच्या मागे उभी राहून अश्‍लील कृत्य करीत असल्याचे पीडित महिलेच्या लक्षात आले.

त्यानंतर चित्रफीत काढणारा चालक, पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांनी मिळून चित्रफितीच्या मदतीने संशयिताला ताब्यात घेतले व मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार, आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे पोलिसांनी चित्रफितीच्या आधारावर बिष्णोईला अटक केली. तो काळाचौकी येथील रहिवासी असून यापूर्वीही त्याने असे प्रकार केले आहेत का, याची पडताळणी पोलिस करीत आहेत.

मुंबई

मुंबई - अपंगांच्या डब्यातून प्रवास करताना महिलांकडे पाहून अश्‍लील कृत्य करणाऱ्या तरुणाला रेल्वे पोलिसांनी अटक केली. तब्बल...

12.27 AM

मुंबई : दादर चौपाटीवर रविवारी (ता.20) आढळलेले माशाचे मृत पिल्लू हे डॉल्फिन नसून व्हेलचे होते, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे; तर...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

महिलांनी घेतली प्लास्टिक पिशव्या न वापरण्याची शपथ मुंबई : श्रावणी अमावस्या, सोमवती अमावस्या आणि पिठोरी अमावस्या असा तिहेरी...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017