अनैतिक संबंधातून मेहुण्यावर कोयत्याने वार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

पत्नीच्या अनैतिक संबंधाला साथ देत असल्याच्या रागातून मेहुण्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना वसईत आज दुपारी 1 च्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी शेषनाथ मदेशिया याला माणिकपूर पोलिसांनी अटक केली. फळ विक्रेता असलेला अजय मदेशिया (37) याच्यावर वार करणाऱ्या शेषनाथला नागरिकांनी लगेचच रोखले. त्यामुळे अजयच्या जीवावरील धोका टळला. 

नालासोपारा : पत्नीच्या अनैतिक संबंधाला साथ देत असल्याच्या रागातून मेहुण्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना वसईत आज दुपारी 1 च्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी शेषनाथ मदेशिया याला माणिकपूर पोलिसांनी अटक केली. फळ विक्रेता असलेला अजय मदेशिया (37) याच्यावर वार करणाऱ्या शेषनाथला नागरिकांनी लगेचच रोखले. त्यामुळे अजयच्या जीवावरील धोका टळला. 

अजय हा साईनगर परिसरात हातगाडीवरून आंबे आणि इतर फळांची विक्री करत होता. याचदरम्यान शेषनाथ सायकलवरून तेथे आला आणि त्याने कोयत्याच्या साहाय्याने अजयवर प्राणघातक हल्ला केला. पहिला वार होताच बाजूला असणाऱ्या चिराग खोकणीने शेषनाथच्या हातावर फटका मारून त्याच्या हातातील कोयता खाली पाडला. लगेचच आसपासच्या नागरिकांनी एकत्र येऊन अजयला गोल्डन पार्क हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अजय हा पत्नीला अनैतिक संबंधांमध्ये साथ देत असल्यामुळेच त्याच्यावर हल्ला केल्याचे शेषनाथने कबूल केले. दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत.  

Web Title: crime in nalasopara mumbai