रमेश कदमांविरोधात अखेर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

मुंबई - सहायक पोलिस निरीक्षकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी अखेर आमदार रमेश कदम यांच्याविरोधात नागपाडा पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 19) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी कदम सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना उपचाराकरिता आर्थर रोड तुरुंगातून जे. जे. रुग्णालयात नेण्यात येत होते. त्या वेळी पोलिसांची गाडी येण्यास उशीर झाल्याने कदम चालत निघाले. सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी कदम यांना थांबण्याची विनंती केली असता त्यांनी त्यांना शिवीगाळ केली. हा प्रकार एका शिपायाने मोबाईलमध्ये चित्रित केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यावर कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

मुंबई

8 ते 10 कोटींचा व्यापार ठप्प मुंबईः भाद्रपद अमावस्या संपत आली असून, दक्षिण मुंबईतील हक्काची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेला...

03.36 PM

ठाणे : ठाण्यात पावसाची रिपरिप सुरूच असुन मागील 24 तासात 151 मिमी पावसाची नोंद झाली. वेधशाळेने दिलेल्या अतिवृष्टीच्या...

12.51 PM

मुंबई : मागील तीन महिन्यांपासून चाललेले मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळाचे...

10.03 AM