प्रोत्साहन भत्ता विलंबाने 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

मुंबई - पालिका शाळेत पाचवी आणि सातवीत शिकणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यात विलंब होत आहे. विद्यार्थी शाळा सोडून गेले तरी त्यांना हा भत्ता मिळाला नसल्याची तक्रार राष्ट्रवादी कॉंग्रेसने पालिकेच्या शिक्षण समितीकडे केली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी शिक्षण समिती अध्यक्षांकडे ही तक्रार केली होती. यावर पालिकेच्या शिक्षण खात्याने स्पष्टीकरण दिले आहे. 2013 नंतर सरकारकडून प्रोत्साहन भत्त्याची रक्कमच मिळाली नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. पालिकेला जेव्हा ही रक्कम मिळाली, तेव्हा तिचे वाटप त्वरित करण्यात आल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. 

विद्यार्थ्यांची मागील वर्षाची 70 टक्के उपस्थिती लक्षात घेऊन हा भत्ता दिला जातो. दोन वर्षांच्या प्रोत्साहन भत्त्याचे वाटप उशिराने करण्यात आले आहे. सातवीचे काही विद्यार्थी नववीमध्ये गेले, तर काही विद्यार्थी शाळा सोडून गेले आहेत. काहींचे पत्ते बदलले आहेत, अशी खान यांची तक्रार आहे. 
 
Web Title: Delay Incentive Allowance in municipal school

टॅग्स