सारंगीवादक पंडित ध्रुवज्योती घोष यांचे निधन

टीम ई सकाळ
सोमवार, 10 जुलै 2017

प्रख्यात सारंगीवादक पंडित ध्रुवज्योती घोष यांचे आज मुंबईमध्ये राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.

मुंबई : प्रख्यात सारंगीवादक पंडित ध्रुवज्योती घोष यांचे आज मुंबईमध्ये राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.

घोष हे 'संगीत महाभारती 'चे संस्थापक पंडित निखिल घोष यांचे सुपुत्र आणि तबला वादक पंडित नयन घोष यांचे धाकटे बंधू होत. त्यांनी एकल सारंगी वादक म्हणून स्थान मिळवले होते. भारतात आणि युरोपात त्यांचे सतत कार्यक्रम होत असत. भारतीय विद्या भवनाच्या संगीत नर्तन विभागाचे ते प्रमुख म्हणून कार्यरत होते. मध्य प्रदेश सरकारतर्फे त्यांना सारंगी वादक 'उस्ताद अब्दुल लतीफ खान यांच्या नावे ठेवलेला पुरस्कारही मिळाला होता. त्यांचे पार्थिव 'संगीत महाभारती 'मध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.