महापालिकेचे डिजिटल मुंबई!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

शिक्षणासह सर्व सुविधा होणार ऑनलाईन
मुंबई - महापालिकेचा कारभार डिजिटल करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. शाळांमध्ये डिजिटल शिक्षण देण्यासह पालिका पुरवत असलेल्या सुविधा ऑनलाईन करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मोबाईल गव्हर्नसवरही भर दिला जाईल, असे पालिकेने सांगितले.

शिक्षणासह सर्व सुविधा होणार ऑनलाईन
मुंबई - महापालिकेचा कारभार डिजिटल करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. शाळांमध्ये डिजिटल शिक्षण देण्यासह पालिका पुरवत असलेल्या सुविधा ऑनलाईन करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मोबाईल गव्हर्नसवरही भर दिला जाईल, असे पालिकेने सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल आणि कॅशलेश इंडियाची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत पालिकेने स्वत:चा कारभार डिजिटल आणि कॅशलेस करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी संपूर्ण निविदा प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा पालिकेचा विचार आहे. सध्या चार सुविधा ऑनलाईन आहेत. पालिकेच्या 111 सुविधा ऑनलाईन करण्याचा संकल्प आहे. त्याच्या पुढील टप्प्यात या सुविधा मोबाईलवरही देण्यात येणार आहेत.

पालिकेची आरोग्य व्यवस्थाही ऑनलाईन केली जाणार आहे. रुग्णांची प्रत्येक महिती ऑनलाईन नोंदवली जाणार असून, त्यांना युनिक आयडेंटिटी क्रमांक देण्यात येणार आहे. असा क्रमांक असलेला रुग्ण पालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात किंवा दवाखान्यात गेला तरी त्याची संपूर्ण वैद्यकीय माहिती डॉक्‍टरांना पाहता येणार आहे. सर्व रुग्णालयांत हा प्रकल्प पुढील आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

कार्यक्रम पत्रिकाही ऑनलाईन
नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांसह नगरसेवकांना दिल्या जाणाऱ्या कार्यक्रम पत्रिकाही ऑनलाईन देण्यात येणार आहेत. तसेच, पालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यालयात येण्याची गरज भासणार नसून त्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर भर देण्यात येणार आहे.

Web Title: digital mumbai in municipal