ई-मेल हॅक करून 11 लाखांचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई - गोवंडीतील कंपनीचे ई-मेल खाते हॅक करून 16 हजार डॉलरचा (10 लाख 89 हजार रुपये) गंडा घातल्याचा प्रकार उघडकीत आला आहे. हॅक केलेले खाते वापरून या कंपनीच्या इटलीतील ग्राहक कंपनीला दुसऱ्या एका खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

"मॅन इन मिडल अटॅक' हा सायबर गुन्ह्याचा प्रकार मुंबईत वाढतो आहे. गोवंडीतील कंपनीला याच पद्धतीने गंडा घालण्यात आला. ही कंपनी इटलीतील कंपनीला नियमित माल पाठवते. तो मिळाल्यानंतर इटलीतील कंपनीत या कंपनीच्या खात्यावर पैसे जमा करते. या कंपनीचा ई-मेल आरोपीने हॅक केला आणि इटलीतील कंपनीला ई-मेल करून आपल्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सांगितले. बरेच दिवस झाल्यानंतरही पैसे खात्यावर न आल्यामुळे या कंपनीने इटलीतील कंपनीशी संपर्क साधला. त्यातून हा प्रकार उजेडात आला. 

मॅन इन मिडल अटॅक 
वर्ष-गुन्हे-फसवणुकीची रक्कम-उकल झालेले गुन्हे 
2015-19-4.33 कोटी-शून्य 
2016-26-14.54 कोटी-माहिती उपलब्ध नाही

Web Title: By e-mail hacking 11 lakh discipleship