मुंबईत ईस्टर्न फ्री वेवर अपघातात दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जुलै 2016

मुंबई - मुंबईतील ईस्टर्न फ्री वेवर आज (मंगळवार) सकाळी इनोव्हा आणि टॅक्सीमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे ईस्टर्न फ्री वेवर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ईस्टर्न फ्री वेवर वडाळा येथे आज सकाळी भरधाव वेगाने जात असलेल्या इनोव्हाच्या चालकाने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून टॅक्सीला धडक दिली. यावेळी अन्य दोन गाड्याही एकमेकांना धडकल्या. या गाड्या रस्त्यावर पलटी झाल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली. ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत होत्या. 

या अपघातामुळे घाटकोपरहून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूकही विस्कळीत झाली. दुसरीकडे कुर्ला स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

टॅग्स