महाविद्यालयांच्या रिक्त जागांची माहितीच विद्यापीठाकडे नाही 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

मुंबई - मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या तिन्ही गुणवत्ता याद्या जाहीर झाल्या आहेत; परंतु त्यानंतरही महाविद्यालयांमधील रिक्त जागांची माहिती विद्यापीठाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची विविध महाविद्यालयांत चौकशीसाठी फेऱ्या मारताना दमछाक होत आहे. प्रवेशासाठी विद्यापीठाकडे नोंदणी करण्याची मंगळवारी (ता. 31) अखेरची मुदत असल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. 

प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या तिन्ही गुणवत्ता याद्यांनंतर प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांतील रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा नसल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील प्रवेशासाठी विद्यापीठ ऑनलाईन नोंदणी करते; परंतु विद्यापीठाकडे या महाविद्यालयांमधील रिक्त आणि प्रवेश घेतलेल्या जागांची माहितीच उपलब्ध नाही. 

"नोंदणीला मुदतवाढ द्यावी' 
विद्यापीठाकडून रिक्त जागांची माहिती मिळत नसल्याने चौकशीला आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या माहितीविनाच परतावे लागत आहे. त्यातच विद्यापीठाने प्रवेशासाठी दिलेली नोंदणीची मुदतही मंगळवारी (ता. 31) संपुष्टात येत आहे. त्यामुळे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. विद्यापीठाने महाविद्यालयांतील रिक्त जागांची माहिती उपलब्ध करून देऊन, नोंदणीसाठीही मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. 

Web Title: Empty seats in the university's colleges do not know