मोखाडा- 15 हजाराची लाच घेताना लेखाधिकाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मोखाडा तालुक्यातील सुर्यमाळ, आडोशी आणि नाशेरा या ग्रामपंचायती मध्ये दलित वस्ती सुधार योजनेतर्गत कामे करण्यात आली आहेत. केलेल्या या कामाची बिले 2 लाख 50 हजारांची होती. ती पारीत करण्यासाठी, मोखाडा पंचायत समितीचे लेखाधिकारी सुरेश गुरव यांनी येथील ग्रामसेवकांकडे 25 हजाराची लाच मागितली होती.

मोखाडा - मोखाडा पंचायत समितीचे लेखाधिकारी सुरेश गुरव यांना 15 हजाराची लाच घेताना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. त्यामुळे लाचखोर अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत.   

मोखाडा तालुक्यातील सुर्यमाळ, आडोशी आणि नाशेरा या ग्रामपंचायती मध्ये दलित वस्ती सुधार योजनेतर्गत कामे करण्यात आली आहेत. केलेल्या या कामाची बिले 2 लाख 50 हजारांची होती. ती पारीत करण्यासाठी, मोखाडा पंचायत समितीचे लेखाधिकारी सुरेश गुरव यांनी येथील ग्रामसेवकांकडे 25 हजाराची लाच मागितली होती. अखेर 15 हजाराची तडजोड करण्यात आली होती. मात्र, सातत्याने विकास कामांची देयके पारीत करण्यासाठी सुरेश गुरव कडून पैशाची मागणी होत होती. त्यामुळे वैतागलेल्या ग्रामसेवकांनी पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सुरेश गुरव या लेखाधिकाऱ्याला पंचायत समिती कार्यालयात सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे. मोखाडा पंचायत समिती मध्ये यापुर्वी ही शिक्षण विभागात अशीच घटना घडली होती.
 

Web Title: esakal marathi news mokhada anti curroption arrest bribe