पालघर तालुक्यातील सफाळे येथे दरोड्याचा प्रयत्न ; एका दरोडेखोराला अटक 4 जण फरार

प्रमोद पाटील
शुक्रवार, 21 जुलै 2017

सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला अगदीच हाकेवर सामंत वाडीत दिपक मोहन सामंत (वय 66) आणि माधवी दिपक सामंत (वय 64) हे वृद्ध जोडपं राहत आहे. गुरूवारी (ता.20) मध्यरात्री साधारण 1.45 च्या दरम्यान पाच दरोडेखोरांनी सामंत यांच्या बंगल्याच्या पाठीमागच्याबाजुचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न सुरू करत असताना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाजाने शेजारी राहत असलेल्या भावेश पाटील यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता पाच अज्ञात व्यकती हातात शस्त्र घेऊन दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करत होते.  

पालघर- तालुक्यातील सफाळे येथील सामंतवाडीत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या पाच दरोडेखोरांपैकी एका दरोडेखोराला नागरिक आणि पोलिस यांच्या दक्षतेमुळे पकडण्यात यश आले असून चार दरोडेखोर फरार झाले आहेत.

सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला अगदीच हाकेवर सामंत वाडीत दिपक मोहन सामंत (वय 66) आणि माधवी दिपक सामंत (वय 64) हे वृद्ध जोडपं राहत आहे. गुरूवारी (ता.20) मध्यरात्री साधारण 1.45 च्या दरम्यान पाच दरोडेखोरांनी सामंत यांच्या बंगल्याच्या पाठीमागच्याबाजुचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न सुरू करत असताना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाजाने शेजारी राहत असलेल्या भावेश पाटील यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता पाच अज्ञात व्यकती हातात शस्त्र घेऊन दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करत होते.  भावेश यांनी सदर घटना आपला मित्र सैफ नाशिर शेख याला फोनवर सांगितली. शेख यांनी तत्काळ सफाळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्यासह उपसरपंच राजेश म्हात्रे यांना सांगितली. या दोघांनीही क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकार्यांसह सामंतवाडी गाठली.
                
असा पकडला दरोडेखोर
पोलिस आणि ग्रामस्थ यांच्या तावडीतून सुटून गेलेल्या दरोडेखोरांचा पाठलाग अंधार आणि सुरू असलेल्या पावसामुळे न थांबवता सर्व नाकेबंदी करून दरोडेखोर गेले कुठे असा प्रश्न पडला होता. शेवटी रेल्वे स्थानकाच्या दिशेने पोलिस आणि ग्रामस्थ यांनी मोर्चा वळवला. पहाटे साडेचार दरम्यान मुंबई कडे जाणारया गाडी पकडण्यासाठी स्टेशन वर येऊन बसलेल्या प्रवाशांची तपासणी करत असताना आरोपी गोविंद गणपत पिंपळे  (वय 22, रा. निमगाव कोसळे, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर) याला हत्यारासह पोलिसांनीअटक केली. 

फासे पारधी टोळीच
अटक करण्यात आलेल्या दरोडेखोराकडे धारदार कोयता  आणि गिरमिट सापडले असून त्याच्यावर या आधी शिडीं  पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र तो आपल्या सोबत असलेल्या साथीदारांची नावे सांगत नाही. मात्र ही फासे पारधी टोळी असून या मुळे परिसरातील अनेक चोरया, दरोडे यांचा सुगावा लागण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, आरोपी पिंपळे यांच्यावर सफाळे पोलिस ठाण्यात  भारतीय दंड कलम 399 आणि 336 लावण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या सह पोलिस हवालदार रमेश कुंभार, विशाल वसावे, उपसरपंच राजेश म्हात्रे , भावेश पाटील, सैफ शेख आदींनी विशेष प्रयत्न केले. 
 

मुंबई

तुर्भे  - दगडखाणींमुळे प्रदूषणात 10 टक्के वाढ होत असून त्यामुळे नागरिकांना श्‍वसनविकारांचा सामना करावा लागत आहे. याच...

05.33 AM

तुर्भे  - 17 वर्षांखालील फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा जवळ आल्याने सायन-पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीचे आणि सुशोभीकरणाचे...

05.03 AM

मुंबई -  अवजड वाहनांचा वापर करून कुलाबा-सीप्झदरम्यानच्या "मेट्रो-3' प्रकल्पाचे काम रात्रीच्या वेळेस करण्यास केलेली मनाई...

04.24 AM