लोकशाही संपुष्टात यायला ईव्हीएम मशीन कारणीभूत - वामन मेश्राम

रविंद्र खरात 
गुरुवार, 19 एप्रिल 2018

सध्या निवडणूक मध्ये वापरण्यात येणाऱ्या इ व्ही एम मशीन लोकशाही संपायला कारणीभूत असून लोकशाही वाचविण्यासाठी मी जेल मध्ये जाण्यास तयार आहे :- वामन मेश्राम 

सध्या निवडणूक मध्ये वापरण्यात येणाऱ्या इ व्ही एम मशीन लोकशाही संपायला कारणीभूत असून लोकशाही वाचविण्यासाठी मी जेल मध्ये जाण्यास तयार आहे :- वामन मेश्राम 

कल्याण : देशातील निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन लोकशाही संपायला कारणीभूत असून सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिले आहेत रिकाउंट करण्याचा जो आदेश देण्यात आला आहे तो प्रभाव शून्य करण्यात आला आहे. हे निर्णय असंविधानिक आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पायमल्ली होत आहे. त्यामुळे रिकाउंट होऊ शकणार नाही. हे नियम रद्द करण्यात यावे सुप्रीम कोर्टाने घटनेच्या चौकटीत राहून काम केले नाही तर आम्हाला कायदा हातात घेऊन ईव्हीएम मशीन तोडावी लागेल. 2019 च्या निवडणुकीत इव्हीएम मशीन तोडणार असून वेळ प्रसंगी लोकशाही वाचविण्यासाठी मी जेल मध्ये जाण्यास तयार आहे, असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी कल्याणमध्ये एका पत्रकार परिषदेत केले. 

बहुजन क्रांती मोर्चा, ठाणे जिल्हास्तरीय विशेष प्रबोधन संमेलन कल्याण पूर्व मधील दादासाहेब गायकवाड क्रीडांगण मध्ये बुधवार ता 18 एप्रिल रोजी संपन्न झाले. या संमेलनामध्ये देशातील विविध निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (Evm) चा वापर करणे म्हणजे भारतीय लोकशाहीला समाप्त करणे तसेच मताचा अधिकार समाप्त करणे होय या विषयावर गँभीर चर्चा मध्ये विविध मान्यवरांनी ईव्हीम मशीन कशी घातक आहे यावर आपले मत मांडले .संमेलनानंतर पत्रकारांशी बोलताना भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, एखाद्या बँकेतील एटीएम द्वारे एखाद्या व्यक्तीने व्यवहार केल्यास त्याला जशी व्यवहाराची पावती येते त्या प्रमाणे निवडणूक मध्ये एखाद्या मतदाराने मतदान केल्यास त्याला पावती का दिली जात नाही , हा कसला पारदर्शक कारभार , असा सवाल करत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर खरपूस टीका केली .

निवडणुकीत  वापरण्यात आलेल्या  ईव्हीएम  मशीन लोकशाही संपायला कारणीभूत असून सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिले आहेत रिकाउंट करण्याचा जो आदेश देण्यात आला आहे तो प्रभाव शून्य करण्यात आला आहेत. हे निर्णय असंविधानिक आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पायमल्ली होत आहे त्यामुळे रिकाउंट होऊ शकणार नाही हे नियम रद्द करण्यात यावे सुप्रीम कोर्टाने घटनेच्या चौकटीत राहून काम केले नाही तर आम्हाला कायद्याला हातात घेऊन ईव्हीएम मशीन तोडावी लागेल 2019 च्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन तोडणार असल्याचा इशारा यावेळी मेश्राम यांनी देत पोलिसाना देखील सांगतोय की माझा हा संदेश तुम्ही निवडणूक आयोग,सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टीस,भारत सरकारला सांगा तुम्हाला काय खर्च लागत असे तर माझ्याकडून घेऊन जा पण माझा संदेश पोहचवा मला अटक करायची असेल तर अटक करा मी लोकशाही मी वाचवण्यासाठी जेल मध्ये जाण्यास तयार असल्याचे मत यावेळी वामन मेश्राम यांनी व्यक्त केले.

Web Title: evm machine responsible for closure of Democracy